Skip navigation.
Home

Ustad Rajamiya in concert

नमस्कार रसिकहो!

शंकराचार्य न्यास सांस्कृतिक विभाग (नाशिक) आणि एन सी पी ए (मुंबई) यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिककर रसिकांसाठी नवीन वर्षाची सुरेल भेट एका खास मैफिलींद्वारे!

आग्रा घराण्याचे वारसदार व सुरेल गायक उस्ताद गुलाम हस्नेन खान उर्फ उस्ताद राजा मियाँ यांच्या मैफिलीचा योग्य नाशिकमध्ये प्रथमच गुरुवार, दि. २६ जानेवारी २०१७ रोजी सायंकाळी ६.३० वाजता डॉ. कुर्तकोटी सभागृह, शंकराचार्य संकुल येथे! आजच्या प्रसिद्धी-माध्यमांच्या युगातही झगमगाटापासून जाणीवपूर्वक काहीसा दूर राहिलेल्या या कलाकाराची ही दुर्मिळ मैफल खास नाशिककर गान-रसिकांसाठी!

उस्ताद गुलाम हस्नेन खान उर्फ राजा मियाँ
साथ-संगत: श्री. निरंजन लेले (संवादिनी) व श्री. मंदार पुराणिक (तबला)
स्थळ: डॉ. कुर्तकोटी सभागृह, शंकराचार्य संकुल, गंगापूर रस्ता, नाशिक
वेळ: गुरुवार, दि. २६ जानेवारी, २०१७ रोजी सायंकाळी ठीक ६.३० वाजता

अवश्य या व आपल्या मित्र-परिवारालाही सांगा. न्यासाच्या प्रथेप्रमाणे सर्व रसिकांस मुक्त प्रवेश!

नववर्ष शुभेच्छांसह सप्रेम,

शंकराचार्य न्यास सांस्कृतिक विभाग

For & on behalf of

SHANKARACHARYA NYAS, NASHIK
Mail: shankaracharya.nyas@gmail.com
Hello: 0253-2232062